मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका मा. अतिरिक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका मा. आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महानगरपालिका
विषय – महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ याची पुणे शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत-

१) पुणे मनपाने खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर सुरु करावा.
२) सर्व खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात पुणे मनपाचा तक्रार निवारण कक्ष, संबंधित मनपा अधिकारी यांचे नाव व टोल फ्री नंबरची माहिती मोठ्या अक्षरात लावावी
३) सर्व खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात मोठ्या अक्षरात १५ पद्धतीच्या दरांचे पत्रक आणि रुग्ण हक्क संहिता लावण्याबाबत

सध्या चर्चेत असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर एकंदरीत पुणे शहरातील खासगी रुग्णालयांचे नियमन व महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम 2021 ची न होणारी अंमलबजावणी उजेडात आली आहे.
१) महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ मधील मुद्दा क्रमांक ६ (मुख्य नियम मधील सुधारित नियम नंबर ११- ब) अनुसार पुणे शहरात मनपातर्फे तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री नंबर कार्यान्वित करावा. तक्रार निवारण कक्ष अधिकाऱ्यांचे नाव व नंबर जाहीर करावा.
२) सर्व खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात पुणे मनपाचा तक्रार निवारण कक्ष, संबंधित मनपा अधिकारी यांचे नाव व टोल फ्री नंबरची माहिती मोठ्या अक्षरात लावण्याबाबतच्या लेखी सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करावी. या लेखी सूचनांची एक प्रत आम्हांस देण्यात यावी.
३) महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ मधील मुद्दा क्रमांक ६ (मुख्य नियम मधील सुधारित नियम नंबर ११- ब) अनुसार तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री नंबर सुरु करुन खाजगी रुग्णालयातील रुग्णांना तक्रार दाखल करण्याची आणि त्यांची सुनवाई घेऊन तक्रार निवारण करण्याची व्यवस्था तात्काळ सुरु करण्यात यावीत.
४) सर्व खासगी रुग्णालयांनी आकारले जाणारे प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर (खात/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रति भेट), सहायक वैद्य शुल्क (प्रति भेट), भूल शुल्क (प्रति भेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहायक शुल्क, भूल सहायक शुल्क (प्रति भेट), शुश्रुषा शुल्क (प्रति भेट), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथालॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क आदी 15 प्रकाराच्या सुविधांचे शुल्क दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
५) महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ मधील मुद्दा क्रमांक ४ (मुख्य नियम मधील सुधारित नियम नंबर ६) अनुसार पुणे मनपा हद्दीतील ज्या खाजगी हॉस्पिटल, रुग्णालय, नर्सिंग होम यांचे वर्ष २०२२ मध्ये नोंदणीकरण अथवा नोंदणी नुतनीकरण अर्जामध्ये दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, रुग्ण हक्क संहिता दर्शनी भागात लावली आहे का याचा उल्लेख करावा आणि त्यानुसार नोंदणीकरण करताना अथवा नोंदणी नुतनीकरण करताना छाननी करावी.
६) महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ मधील मुद्दा क्रमांक ३ (मुख्य नियम मधील सुधारित नियम नंबर ५) अनुसार पुणे मनपा हद्दीतील सर्व खाजगी हॉस्पिटल, रुग्णालय, नर्सिंग होम यांना दिलेले नोंदणीकरण प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयांची यादी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तत्काळ जाहीर करण्यात यावी.





Users Today : 10
Users Yesterday : 3