पुणे 18.4.25
पुणे गुरुवारी रात्री चंदनगर परिसरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. आरोपी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून प्रदीप अडागळेच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रदीप अडागळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांना चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिलेल्या माहितीनुसार, ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता यांनी मिळून प्रदीपच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप अडागळे हा ऋषी आणि त्याच्या आईला सतत शिवीगाळ करत होता. यासोबतच, प्रदीपचे ऋषीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणातून आणि रागातून आई आणि मुलाने मिळून प्रदीपचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदननगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.वर्षभराची खुन्नस आणि राग यातून दोघांनी प्रदीप अडागळेच्या डोक्यात फरशी घालून त्यास संपवलं.





Users Today : 10
Users Yesterday : 3