Pune 27/25

पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना नुकतीच घडली . या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून नराधम फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत. या घटनेनंतर खळबळ माजलेली असतानाच त्याच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट आगारात महिला कंडक्टरचे 30 हजार रुपये चोरीला गेले आहेत. तिकीट विक्रीतून जमा झालेली 30 हजार रुपयांची ही रोकड चोरण्यात आल्याचे कंटक्टरकडून सांगितले जात आहे.
कोरेगाव डेपोच्या महिला कंडक्टर साताऱ्यावरून स्वारगेटला लालपरी घेऊन ड्युटीला आले होते. दरम्यान, स्वारगेटवरून परत जाण्यापूर्वी या महिला कंडक्टर फ्रेश होण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र परत आल्यावर पाहिले असता त्यांची पैशांची बॅगच चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वारगेट स्थानकात बस आल्यानंतर या महिला कंडक्टर खाली उतरल्या. त्यावेळी लालपरी असलेल्या बसमधील सर्व प्रवासीही खाली उतरले होते. मात्र 3-4 प्रवासी बसमध्ये होते. त्याच्यापैकीच कोणीतरी पैशांची ती बॅग चोरली असल्याचा संशय त्या महिला कंडक्टरने व्यक्त केला आहे.. यासंदर्भात कोरेगाव डेपोमध्ये तक्रार नोंदवणार असल्याची माहिती या महिला वाहकांने दिली….





Users Today : 10
Users Yesterday : 3