Home » ताज्या बातम्या » तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहा यंदाच्या उन्हाळ्यात कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार..उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार..

 तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहा यंदाच्या उन्हाळ्यात कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार..उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार..

महाराष्ट्र 2/3/25

Oplus_1310723

पुणे 2 तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावे.यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) राज्यात कमाल किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या व तीव्रता अधिक असेल. अशा स्थितीत तप्त उन्हाळ्याचा मुंबई व गोवा सामना करावा लागणार आहे. मुंबई, पुणे त फेब्रुवारीच्या मध्यापासूनच नागरिकांना उकाड्याचा आणि उन्हाच्या तड्याख्याचा सामना करावा लागला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली होती. काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटांचाही इशारा मुंबईला देण्यात आला होता. मागील 3-4 दिवसांत उष्ण व दमट हवामानामुळे मुंबईकर हवालदिल झाले होते. आता पुन्हा मार्च महिन्यात नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. यावेळी उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी अधूनमधून काही अंशांनी वाढ होईल. उष्ण व दमट हवामान असेल. यामुळे उकाडा सहन करावा लागेल. याचबरोबर काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मार्च महिना उष्णतेचा ठरणार आहे.

Oplus_131072

फेब्रुवारीमध्ये साधारणपणे मुंबईत सर्वाधिक कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचते. फेब्रुवारीच्या मध्यानंतर तापमान वाढ व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा आणि मार्चचे पहिले काही दिवस तापमानामध्ये चढ-उतार होत राहतात. एकाएकी तापमानाचा पारा वर चढतो, मात्र त्यानंतर तापमान चढेच राहील, असे नसते. ते थोडे खालीही उतरते. मात्र हिवाळ्यासारखा दिलासा आता अनुभवता येणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईला समुद्रकिनारपट्टी लाभल्याने हा पारा सतत चढता नसतो. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानामध्ये घटही होते. प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेला ला निना कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे.

jenews24
Author: jenews24

Share This:

Facebook
X
WhatsApp
Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Stories

Cricket Live

Horoscope