Pune 19/3/25
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही खरं तर प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे. कारण अवघ्या 9 दिवसांसाठी अंतराळवारीसाठी गेलेल्या सुनीता तब्बल 9 महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत. सुनीता व बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचा कॅप्सूल भारतीय वेळेनुसार आज पहाटे 3:27 मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वीरीत्या उतरले. सुनीता पुन्हा कधी पृथ्वीवर परततील की नाही असे वाटत असतानाच अखेर ही अशक्य कामगिरी नासातील शास्त्रज्ञ आणि स्पेस एक्सच्या सदस्यांनी शक्य करून दाखवली आहे. सुनीता यांनी करून दाखवलेली संशोधनची ही कामगिरी आकाशवीर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक सुनीतांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील . सुनीता विल्यम्स यांनी दाखवलेला प्रचंड संयम, अतुलनीय धाडस, कधीच हार न मानण्याची ध्येयासक्ती हे सारे निव्वळ प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा..
पहा विडिओ





Users Today : 10
Users Yesterday : 3